बाभूळगाव बु. येथे मीटरधारक अंधारात तर आकडे बहाद्दर उजेडात

Foto
महावितरणकडे नाही कारवाईला वेळ

सिल्लोड, (प्रतिनिधी) सिल्लोड तालुक्यातील बाभूळगाव बु. येथे भरदिवसा अवैधरीत्या विद्युत तारांवर आकडे टाकून मोठ्या प्रमाणात वीज चोरी करण्यात येत आहे. तर विद्युत तारांवर आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या या आकडे बहाद्दरांवर महावितरण कंपनीकडून कुठलीही कारवाई करत नाही. तरी विद्युत तारांवर आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या आकडे बहादारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मीटरधारक व नागरीकांतून होत आहे.

तर बाभूळगाव बु. येथे महावितरणच्या दुर्लक्षामुळे वीज मीटरधारक अंधारात तर आकडेबहाद्दर उजेडात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मीटर घेतलेल्या ग्राहकांना या आकडे बहाद्दरांमुळे रोजच अंधाराचा सामना करावा लागला आहे. आकडे बहाद्दर अवैधरित्या विद्युत तारांवर आकडे टाकून वीज चोरी करत आहे. यामुळे डीपीवरील ताण वाढल्याने विजेचा दाब कमी जास्त होऊन घरातील विद्युत उपकरणे जळणे, डीपीवरील फ्युजमध्ये वारंवार बिघाड होणे, डीपीत स्फोट होणे, वारंवार वीज गूल होणे आदी प्रकारांमुळे विद्युत मीटर घेतलेल्या मीटर ग्राहकांना या वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे अडचणीचा सामना करावा लागला आहे.

तर आकडे धारक एका विद्युत तारांवरील फ्युज गेला की दुसऱ्या विद्युत फ्युज मधील तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू असलेल्या त्या तारेवर आकडेबहाद्दर आकडा टाकून लाईट चालू करून घेतात. मात्र मीटर धारकाला एकाच तारा वरून कनेक्शन असल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव अंधाराचा सामना करावा लागतो. मीटरधारकांना बिल मात्र पूर्ण भरावे लागते. हा प्रकार रोजचाच असुन यामुळे मीटरधारकांना डिझेल किंवा गोडतेलाचा नि दिवा लावून घरात उजेड करावा लगते. 
या आकडेधारकावर महावितरण एवढी मेहरंबन कशी काय आहे. विशेष म्हणजे बाभूळगाव बु. या गावामध्ये बोटावर मोजणे इतकेच मीटर धारक आहेत. मात्र आकडे धारक मोठ्या प्रमाणात आहे. तरी महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या होणाऱ्या वीज चोरीकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीज चोरी करणाऱ्या या आकडेबहाद्दरांवर कडक कारवाई करावी, 
तसेच गावातील विद्युत खांबावरील विद्युत तारा काढून त्या ठिकाणी केबल टाकण्यात यावी अशी मागणी मीटरधारक व नागरिकांनी केली आहे. सिल्लोड तालुक्यातील बाभूळगाव बु. येथे भरदिवास आकडेटाकून अशी वीज चोरी केली जात आहे.